ममतांना पराभूत करणारे शुभेंदू अधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक…

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या गाडीवर दगड मारत अज्ञातानी हमला केला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी ममतांना 1700 मतांनी पराभूत केले आहे.

    दरम्यान पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच आता अजून एक बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमधल्या आरामबाग इथं असलेल्या भाजपाच्या कार्यालयाला आग लागल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच्या आपल्या ट्विटमध्ये त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ही आग लावली असल्याचे आरोप केले आहेत. त्याचसोबत या कृत्याचा निषेधही केला आहे.