अभ्यास करुन करुन कंटाळलेल्या ‘या’ चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला जाब ; व्हिडिओ भन्नाट व्हायरल

सध्या अशाच एका चिमुकलीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अभ्यास करुन करुन कंटाळलेल्या या चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर काश्मीरमधील एका ६ वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ऑनलाइन क्लास आणि त्यानंतर देण्यात येणाऱ्या गृहपाठाविषयी पंतप्रधान मोदींकडे तक्रार करतांना दिसत आहे.

    कोरोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी शाळा व महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन स्वरुपात त्यांचे लेक्चर्स सुरु आहेत. परंतु, या लेक्चर्समध्ये विद्यार्थी व पालक यांचे अनेक धम्माल किस्से घडत असतात. यापैकी अनेक मजेशीर किस्से आपण सोशल नेटवर्किंगवर पाहिलेदेखील असतील.

    सध्या अशाच एका चिमुकलीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अभ्यास करुन करुन कंटाळलेल्या या चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर काश्मीरमधील एका ६ वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ऑनलाइन क्लास आणि त्यानंतर देण्यात येणाऱ्या गृहपाठाविषयी पंतप्रधान मोदींकडे तक्रार करतांना दिसत आहे.

    दररोज सकाळी मला १० ते १२ वाजेपर्यंत ऑनलाइन क्लासला बसावं लागतं. इंग्रजी, गणित, उर्दू, पर्यावरण, कंप्युटर अशा अनेक विषयाच्या लेक्चर्सला मला ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावावी लागते. त्यानंतर घरचा अभ्यासही करावा लागतो, असं ही मुलगी या व्हिडिओमध्ये सांगत आहे.