ममता बॅनर्जी जखमी झाल्याने जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द, लवकरच ठरणार नवी तारीख

दुसरीकडे, ममता बॅनर्जींवरील हल्ल्याच्या वृत्तानंतर बंगाल भाजपा उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी हा काय तालिबान आहे का असा सवाल केला. मोठ्या संख्येत त्यांच्या अवतीभवती पोलिस असतात. त्यांच्यापर्यंत कोण पोहोचू शकतो असा सवाल केला. चार आयपीएस अधिकारी त्यांच्या सुरक्षेचे प्रभारी आहेत. त्यांचे निलंबनच व्हायला हवे. हल्लेखोर अचानक गायब होऊच शकत नाही, बॅनर्जीच नाटक करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्याचा परिणाम तृणमूल काँग्रेसच्या नियोजित कार्यक्रमांवर होताना दिसत आहे. ममता बॅनर्जींच्या हस्ते होणाऱ्या जाहीरनाम्याचं प्रकाशन सध्या पुढं ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय.

    आज (गुरुवारी) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते तृणमूल काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार होतं. यासाठी एका भव्य कार्यक्रमाचं आणि पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी ममता बॅनर्जी जखमी झाल्यामुळे त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आज होणारा हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय. लवकरच कार्यक्रमाची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.

    बॅनर्जी या आज बुधवारी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. नेमके काय घडले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुरक्षारक्षकांनी ममतांना उचलून मोटारीत बसवल्याचे दिसले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आज रात्री नंदिग्राममध्ये मुक्काम करण्याचे ममतांचे नियोजन होते. मात्र, या हल्ल्यानंतर त्या थेट कोलकत्याकडे रवाना झाल्या. दम्यान, कारजवळ उभी असता काही लोकांनी धक्का दिला असे ममता म्हणाल्या.