Treatment of corona with Gangajala; Court notice to ICMR

यापूर्वी मार्च 2020 मध्ये राष्ट्रपतींना गंगाजलाने कोरोनाचा उपचारावरून संशोधन पत्र पाठविण्यात आले होते. गंगा मंत्रालयाने हे पत्र आयसीएमआरला पाठविले होते, जे आयसीएमआरने नाकारले होते. यावर वाराणसी हिंदू विद्यापीठाच्या 5 डॉक्टरांच्या टीमने संशोधन केले होते. याविषयीचे संशोधन इंटरनॅशनल जर्नलमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाशित झाले होते.

    प्रयागराज : गंगजलाने कोरोनावर उपचार प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचले आहे. याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, जी कोर्टाने स्वीकार केली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एथिक्स कमिटी व आयसीएमआरला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. हायकोंटाने या दोन्ही संस्थांना 6 आठवड्यांचा वेळ दिला आहे. या याचिकेत गंगाजलाने कोरोनावर उपचार केला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

    यापूर्वी मार्च 2020 मध्ये राष्ट्रपतींना गंगाजलाने कोरोनाचा उपचारावरून संशोधन पत्र पाठविण्यात आले होते. गंगा मंत्रालयाने हे पत्र आयसीएमआरला पाठविले होते, जे आयसीएमआरने नाकारले होते. यावर वाराणसी हिंदू विद्यापीठाच्या 5 डॉक्टरांच्या टीमने संशोधन केले होते. याविषयीचे संशोधन इंटरनॅशनल जर्नलमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाशित झाले होते.

    यासंबंधी 30 रुपयांचा एक नेझल स्प्रेदेखील बनविण्यात आला होता तसेच 600 लोकांची एक टीमदेखील बनविण्यात आली होती. 300 लोकांना नेजल स्प्रे देण्यात आला होता व त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा दावा करण्यात आला होता. ज्यांना हा नेजल स्प्रे देण्यात आला नाही, त्या लोकांचे रिपार्ट पॉझिटिव्ह आला होता. जनहित याचिकेत गंगाजलाने कोरोना उपचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश एमएन भंडारी व न्यायमूर्ती राजेंद्रकुमार चतुर्थ यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.