आमदार गणेश घोगरा
आमदार गणेश घोगरा

राजस्थानातील डुंगरपूर येथील आमदार गणेश घोगरा यांनी आदिवासींबाबत अजब वक्तव्य केले. आदिवासी हिंदू नाहीत त्यामुळे त्यांना हिंदूंपासून वेगळे करावे, अशी मागणीच त्यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान केली.

    जयपूर (Jaipur). राजस्थानातील डुंगरपूर येथील आमदार गणेश घोगरा यांनी आदिवासींबाबत अजब वक्तव्य केले. आदिवासी हिंदू नाहीत त्यामुळे त्यांना हिंदूंपासून वेगळे करावे, अशी मागणीच त्यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान केली. त्यांच्या या विधानानंतर विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. घोगरा हे आदिवासी समाजातीलच आहेत. यावेळी त्यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला. उल्लेखनीय असे की आदिवासींबाबतचे मुद्दे यापूर्वी भारतीय ट्रायबल पक्षानेही विधानसभेत लावून धरले होते.

    आम्ही आदिवासी स्वत:ला हिंदू मानत नाहीत. आमच्यावर हिंदू धर्म थोपवला जात आहे. आमची संस्कृती, परंपरा भिन्न आहेत. आमचे खानपान आणि रीतिरिवाजही वेगवेगळे आहेत. त्यामुळेच आमचा धर्मकोड वेगळा असावा कारण आमची संस्कृती हिंदूधर्मापेक्षा वेगळी आहे.-- गणेश घोगरा, आमदार, काँग्रेस

    पक्षालाच दिला घरचा अहेर
    यावेळी घोगरा यांनी त्यांच्याच पक्षाच्या सरकारला घरचा अहेर दिला. आदिवासींकडे जमीन नाही, खाण्यासाठी धान्य नाही, कपडेही नाहीत असे सांगत आम्हाला घाबरवून, धमकाववून राजकीय स्वार्थासाठी राजपूत ठरविले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.