ना बँड, बाजा, बारात..,बारावीच्या विद्यार्थ्यांनी केली लगीन घाई, व्हिडिओ व्हायरल होताच झाली निलंबनाची कारवाई

आंध्रप्रदेशमध्ये ( Andhra Pradesh ) बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Twelfth grade students) आपल्या वर्गातच लग्नगाठ (wedding)  बांधल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचा व्हिडिओ (Video viral on social media) देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे.

जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात पडतात. तेव्हा त्यांना जग हे बदलल्यासारखं वाटतं. परंतु भावा दिसतं तसं नसतं, म्हणून.., आंध्रप्रदेशमध्ये ( Andhra Pradesh ) बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Twelfth grade students) आपल्या वर्गातच लग्नगाठ (wedding)  बांधल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचा व्हिडिओ (Video viral on social media) देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशच्या राजाहमुंद्री शहरात ही घटना नोव्हेंबर (November) महिन्यात घडली आहे. घटनेतील दोन्ही विद्यार्थी हे अल्पवयीन असून शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत. या दोघांनीही आपल्याच वर्गात एकमेकांशी लग्न केल्याने खळबळ उडाली आहे. मुलगा मुलीच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा दोरा बांधतांना दिसत आहे. हा व्हिडिओ मुलीच्या चुलत बहिणीने काढल्याची माहिती मिळत आहे.

हा व्हिडिओ नेमका व्हायरल कसा झाला, याचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. चौकशीअंती हे विद्यार्थी महाविद्यालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला विनंती करून लवकर वर्गात आले होते, अशी माहिती मिळत आहे. परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.