Twins are born in this village; 45 twins are born in 1000 children

जुळी मुले आपण नेहमीच पाहतो. पण भारतात असे एक गाव आहे जिथे जुळी मुलेच जन्माला येतात. यामागील रहस्य कोणालाच माहीत नाही. शास्त्रज्ञ ही यामुळे चकीत झाले आहेत. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावात जुळी मुले जन्माला येतात. कोडिन्ही गावाला 'व्हिलेज ऑफ ट्विंस' आणि 'ट्वीन टाउन' असे म्हटले जाते.

    तिरुवनंतपूरम : जुळी मुले आपण नेहमीच पाहतो. पण भारतात असे एक गाव आहे जिथे जुळी मुलेच जन्माला येतात. यामागील रहस्य कोणालाच माहीत नाही. शास्त्रज्ञ ही यामुळे चकीत झाले आहेत. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावात जुळी मुले जन्माला येतात. कोडिन्ही गावाला ‘व्हिलेज ऑफ ट्विंस’ आणि ‘ट्वीन टाउन’ असे म्हटले जाते.

    जगभरात 1000 मुलांमध्ये 4 जुळी मुले जन्माला येतात. मात्र, या गावात 1000 मुलांमध्ये 45 जुळी मुले जन्माला येतात. जुळ्या लोकांबद्दल असलेल्या रेकॉर्डचा विचार केल्यास केरळमधील हे गाव जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आशियामध्ये पहिला क्रमांक लागतो.

    मलप्पूरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावाची लोकसंख्या ही जवळपास 2000 आहे. या गावात घर, शाळा, बाजार, रुग्णालयात सर्व जुळी मंडळीच दिसतात. जुळी मुले जन्माला येण्यामागे अनुवंशिक कारण असल्याचे म्हटले जाते.