crime scene

शाळेत (school) मधल्या सुट्टीच्या वेळी वर्गातून बाहेर आलेल्या नववीच्या विद्यार्थ्यावर (student Stabbed) दोघांनी चाकूचे वार केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू (Death)झाला आहे.

    रायपूर : छत्तीसगडमधील(Chattisgad) रायपूरमध्ये(Raipur Crime) एक भयानक घटना घडली आहे. येथील एका शाळेत (school) मधल्या सुट्टीच्या वेळी वर्गातून बाहेर आलेल्या नववीच्या विद्यार्थ्यावर (student Stabbed) दोघांनी चाकूचे वार केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू (Death)झाला आहे. मैदानात आलेल्या या विद्यार्थ्याच्या छातीत चाकूचे वार करण्यात आले.

    सागर टंडन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेची मधली सुट्टी झाल्यामुळे काहीजण डबा खात होते तर काहीजण मैदानात खेळत होते. सागर नेहमीप्रमाणे मैदानात खेळण्यासाठी जात असताना दोन अल्पवयीन मुलांनी सागरवर हल्ला केला. चाकूने त्याच्या पोटात आणि छातीत वार केले.या हल्ल्यामुळे रक्तबंबाळ झालेला सागर स्टाफरुमच्या दिशेने धावत गेला. तिथे शिक्षण जेवण करत होते. शिक्षकांच्या समोर पोहोचलेला सागर तिथेच गंभीर जखमी झाल्याने कोसळला.सागरला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

    सागरवर हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. हा हल्ला शाळेतील प्रेमप्रसंगावरून झाला असण्याची शक्यता आहे. सागरच्या वरच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचं हल्लेखोरासोबत प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सागरनं आपली छेड काढल्याची तक्रार या मुलीनं हल्लेखोराकडं केली होती. त्यानंतर हल्लेखोर आणि सागरमध्ये बाचाबाचीही झाली होती. त्यावेळी हे प्रकऱण शांत झालं होतं. मात्र आता पुन्हा त्या हल्लेखोरांनी सागरवर चाकूनं वार करून त्याचा खून केला. दोघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.