एलओसीजवळील पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद, चार जखमी

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीजवळ केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत. कुपवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये आज गुरुवारी सकाळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. त्यांनी मोर्टारही डागले, असे श्रीनगर स्थित संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.

पूर्व लडाख सीमेवर भारत-चीन अशी तणावाची स्थिती असताना, एकीकडे चीनची कुरापत वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती सुरूच आहेत.जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) नौगाम सेक्टरमधील एलओसीजवळ (LOC) पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीजवळ केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत. कुपवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये आज गुरुवारी सकाळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. त्यांनी मोर्टारही डागले, असे श्रीनगर स्थित संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.

सीमेपलीकडून झालेल्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत असे कर्नल कालिया यांनी सांगितले. तसेच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.