maoist

पोलिस अधीक्षक वी. सत्यनारायण, प्रभारी कुमारम भीम यांनी सांगितले की, “आमच्या सुरक्षा दलाने रात्री माओवाद्यांचा शोध सुरू ठेवला. सकाळी (रविवारी) आम्हाला दोन मृतदेह आढळले. त्यातील एकाची ओळख पटली आहे.

हैदराबाद : तेलंगानाच्या (Telangana ) कुमारम भीम जिल्ह्यात पोलिस आणि माओवाद्यांच्या चकमकीत (clash) दोन माओवादी (wo Maoists) ठार (killed) झाले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, शनिवारी रात्री पोलिसांना महाराष्ट्र लगतच्या जिल्ह्यातील कदंबा गावाजवळ जंगलांमध्ये शोधमोहीम चालू होती. माओवाद्यांच्या गटाने गोळीबार केल्याची गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथक जंगलातील भागात शोध मोहीम राबवित असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला असता ते तेथून पळून गेले.

पोलिस अधीक्षक वी. सत्यनारायण, प्रभारी कुमारम भीम यांनी सांगितले की, “आमच्या सुरक्षा दलाने रात्री माओवाद्यांचा शोध सुरू ठेवला. सकाळी (रविवारी) आम्हाला दोन मृतदेह आढळले. त्यातील एकाची ओळख पटली आहे. ” ते म्हणाले की, मारल्या गेलेल्या दुसर्‍या माओवादीची ओळख पटवली जात आहे. पोलिसांनी मृतदेहांकडून दोन शस्त्रे आणि माओवादी साहित्य जप्त केले आहे.