two passenger vehicles got trapped in the snow at Razdan

जम्मू : हिमस्खलनामुळे जम्मू-काश्मीरच्या गुरेझ खोऱ्यात दोन प्रवासी वाहने अडकली. यातील प्रवशांना सुखरुप बाहेर काढण्यात सैन्याला यश आले. मात्र, ही दोन्ही वाहने बर्फाखाली गाडली गेली.

बांदीपोरा येथून गुरेझकडे जात असताना दोन प्रवासी वाहने रझादान येथे बर्फात अडकल्याची माहिती जम्मू-काश्मिरच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली. याची महिती मिळताच सैन्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले.

यांनतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या कर्मचाऱ्यांना या वाहनांना बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊ शकला.