जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, खबरदारीसाठी इंटरनेट सेवा बंद

जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी य भागात शोधमोहिम सुरू केली. शुक्रवारपासून ही शोधमोहिम सुरू होती. ही मोहिम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी उच्छाद मांडलाय. भारतीय जवानांनी नुकताच दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत दोन दहशतवादी जखमी झाले. हे दहशतवादी नेमक्या कुठल्या संघटनेचे होते, ते मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी य भागात शोधमोहिम सुरू केली. शुक्रवारपासून ही शोधमोहिम सुरू होती. ही मोहिम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

शनिवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांची शोधमोहिम सुरूच होती. शोपियानमध्ये घडलेल्या या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय.

दोनच दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्लामध्य भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं होतं. तर १३ डिसेंबर रोजीदेखील जम्मूमधील गजनवी फोर्सजवळ दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.