soldiers

काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी (Terrorists) आपल्या कारवायांना सुरुवात केल्याचं दिसत आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) शोपियां (shopian) जिल्ह्यातील सुगन झैनापोरा भागात सैनिक व दहशतवाद्यांमध्ये (Terrorists Attack) जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा (encounter) करण्यात सैनिकांना यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने (ANI) हे वृत्त दिलं आहे.

गुप्तचर संस्थेस सुगन परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सैनिकांच्या पथकाने संपूर्ण परिसरा वेढा दिला. सैनिकांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला व चकमकीस सुरूवात झाली.

 

प्राप्त माहितीनुसार अद्यापही या परिसरात दहशतवादी व सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे. सैनिकांकडून परिसरात अन्य ठिकाणी देखील शोधमोहीम राबवली जात आहे.

काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं असून, दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन सैनिक शहीद झाले होते. तर तीन सैनिक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंपोर बायपास येथे गस्तीवर असणाऱ्या सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीच्या (आरओपी) पथकावर काही दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला होता. यामध्ये पाच सैनिक जखमी झाले होते, त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील दोन सैनिकांवर उपचार सुरु असताना त्यांना वीरमरण आलं.