दोन महिला जिद्दीला पेटल्या…. दारुच्या दुकानासाठी लागली ५१० कोटींची बोली !

सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही बोली १२ तास उलटले तरी संपत नव्हती. अखेर तब्बल १५ तासांनी म्हणजे रात्री २ वाजता हा लिलाव बंद झाला. ५१० कोटी रुपयांच्या रेकॉर्ड ब्रेक बोलीवर हा लिलाव समाप्त झाला आणि आबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

    राजस्थान : बायका काय करतील याचा काही नेम नाही अंस गमंतीने म्हंटले जाते. मात्र, याचा प्रचिती देणारा प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे. एकाच कुटुंबातील दोन महिला जिद्दीला पेटल्या. आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या महिलांनी दारुच्या दुकानासाठी ५१० कोटींची बोली लावली.

    सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही बोली १२ तास उलटले तरी संपत नव्हती. अखेर तब्बल १५ तासांनी म्हणजे रात्री २ वाजता हा लिलाव बंद झाला. ५१० कोटी रुपयांच्या रेकॉर्ड ब्रेक बोलीवर हा लिलाव समाप्त झाला आणि आबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

    राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या दारुच्या दुकानांचा (Liquor Shop) लिलाव सुरु आहे. हनुमानगड जिल्ह्यातील कुईआ गावातील एका दारुच्या दुकानावर ७२ लाख रुपयांपासून सुरु झालेली ही बोली सतत वाढत गेली. एका कुटुंबातील दोन महिलांमध्ये अशी स्पर्धा झाली की, दारूच्या दुकानाची बोली त्याच्या किमतीपेक्षा ७०८ पट अधिक वाढली. अखेरीस ५१० कोटी रुपयांची बोली लागली. एका दारुच्या दुकानासाठी इतकी बोली लागली यावर आबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अजूनही विश्वास बसत नाही.

    या लिलावाच्या विजेत्या किरण कंवर यांना दोन दिवसांमध्ये एकूण बोलीच्या 2 टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विजेत्यानं या दुकानाची खरेदी प्रक्रीया पूर्ण केली नाही तर त्याचे नाव काळ्या यादीमध्ये (Black List) टाकले जाईल असंही सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.