
या फोटोमध्ये नाईक दांमपत्य येल्लापूर येथील एका मंदिरात देव दर्शन घेताना दिसत आहेत. मंदिरात देवाचं दर्शन घेऊन ते गोकर्णला निघाले होते. गोकर्णला सकाळी ८ वाजता पूजा होती. सकाळी निघालो तर उशीर होईल म्हणून ते रात्री उशिराच तेथून निघाले. लवकर पोहोचण्यासाठी एनएच-६३ वर शॉर्टकट पकडला होता. हा शॉर्टकटच जीवघेणा ठरला.
दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. कर्नाटकच्या अंकोला तालुक्यात झालेल्या या अपघातात नाईक यांची पत्नी आणि त्यांचा स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला. तर, नाईक यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेनंतर नाईक आणि त्यांच्या पत्नीचा एक फोटो चर्चेत आला आहे. अपघाताच्या आधीचा हा फोटो आहे.
या फोटोमध्ये नाईक दांमपत्य येल्लापूर येथील एका मंदिरात देव दर्शन घेताना दिसत आहेत. मंदिरात देवाचं दर्शन घेऊन ते गोकर्णला निघाले होते. गोकर्णला सकाळी ८ वाजता पूजा होती. सकाळी निघालो तर उशीर होईल म्हणून ते रात्री उशिराच तेथून निघाले.
लवकर पोहोचण्यासाठी एनएच-६३ वर शॉर्टकट पकडला होता. हा शॉर्टकटच जीवघेणा ठरला.
हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला होता. यामुळेच एखादा खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडेला झाडीझुडपांवर जाऊन आदळली. यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात पत्नी विजया यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात नाईक यांच्या सेक्रेटरीचा देखील मृत्यू झाला.
दुर्देवाने पत्नीसोबतचा त्यांचा येल्लापूर मंदिरातील फोटो शेवटचा ठरला आहे. काही वेळांपूर्वी फोटोत सोबत दिसणारी पत्नी त्यांना कायमची सोडून गेली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीच्या मृत्यू मनाला चटका लावणारा असाच आहे.