केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मला आणि माझ्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. मला दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यामुळे मी २६ एप्रिलला आसनसोलमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदान करू शकणार नाही, असे ट्वीट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.

    पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना कोरोनाची लागण झाली झाली. बाबुल सुप्रियो यांच्यासह त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.