Sadhu-Sant's Shankhanad agitation against Minister Vijay Vaddetiwar and Thackeray government tomorrow

देश कोरोनासारख्या जीवघेण्या संकटाचा सामना करत असताना केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते मात्र कोरोनाला पळविण्यासाठी अवैज्ञानिक उपाययोजना करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना आढळत आहेत. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यानंतर आता भाजपा आमदार गोपाळ शर्मा वादात अडकले आहेत.

    मेरठ : देश कोरोनासारख्या जीवघेण्या संकटाचा सामना करत असताना केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते मात्र कोरोनाला पळविण्यासाठी अवैज्ञानिक उपाययोजना करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना आढळत आहेत. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यानंतर आता भाजपा आमदार गोपाळ शर्मा वादात अडकले आहेत.

    भाजपा आमदार गोपाळ शर्मा यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत ते एका हातगाडीवर पेटलेले हवनकुंड ठेवून रस्ते आणि गल्ल्यांत फिरत हनुमान चालिसाचे पठण करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी शंखनादही केला.

    गल्ल्यांतून फिरताना आपल्या सहकाऱ्यांसह जय श्रीराम आणि हर हर महादेव अशा घोषणाही देताना दिसत आहेत. गोपाळ शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार, कोरोना व्हायरसला पळवून लावण्यासाठी आणि हवा शुद्ध करण्यासाठी ते या प्रकारे उपाययोजना करत आहेत.

    यासाठी हवनसामग्रीमध्ये देशी गायीच्या गोबरसोबत, शुद्ध तूप, कापूर आणि आंब्याच्या झाडांचा लाकडांचा वापर केल्याचेही त्यांनी म्हटले. यामुळे हवेतील ऑक्सिजनमध्ये वाढ होत असल्याचा ‘अवैज्ञानिक’ दावाही आमदार महाशयांनी केला.