How can the election symbol be the party's 'logo'? sj

यायालयात गैरहजर राहण्यासाठी एका भाजपा आमदाराने न्यायलयात खोटा करोना अहवाल सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर न्यायालयाने या आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. खोटा करोना अहवाल देण्याऱ्या डॉक्टरवही कारवाई होणार आहे.

बस्ती : न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी एका भाजपा आमदाराने न्यायलयात खोटा करोना अहवाल सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर न्यायालयाने या आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

राकेश सिंह बघेल असे या भाजप आमदाराचे नाव आहे. बघेल हे उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरच्या मेहदावल येथील आमदार आहेत.

२०१० साली सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बघेल यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील चार वर्षांपासून न्यायलयात हा खटला सुरू आहे. आदेश देऊनही ते न्यायालयात हजर राहणे टाळत राहिले. त्यामुळे या खटल्याचे कामकाज अडकून पडले आहे. मात्र, यावेळी न्यायालयात हजर राहणे टाळण्यासाठी त्यांनी नविन शक्कल लढवली पण यात पून्हा तेच अडकले.

न्यायालयाने खटल्यासाठी उपस्थित राहण्याची सूचना केल्यानंतर बघेल यांच्या वकिलांनी ९ ऑक्टोबर रोजी बघेल हे करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. तसेच त्यांना होम आयसोलेशन मध्ये राहावे लागेल असे न्यायालयाला सांगीतले. न्यायालयाने या अहवालाची चौकशी केल्यानंतर हा अहवाल खोटा असल्याचे उघडकीस आले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राकेश बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच खोटा करोना अहवाल दिल्याबद्दल डॉ. हर गोविंद सिंह यांच्याविरूद्धही कारवाई करत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.