रक्षाबंधनाच्या सणानिमित्त योगी सरकारचा मोठा निर्णय! यूपी पूर्णपणे होणार लॉकडाऊनमधून आझाद, विकेंड Lockdown उठवणार का?

यूपीमध्ये कोव्हिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्रेसिव ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटसोबतच कोरोनावरील लसीकरण अभियानाला चांगलीच गती मिळाली आहे. तसेच राज्यात 7 कोटी 1 लाख 69 हजारपेक्षा जास्त कोव्हिडचे नमुने आढळले आहेत. त्याचप्रमाणे 6 कोटी 24 लाख पेक्षा जास्त व्हॅक्सिन येथील नागरिकांनी घेतली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 1 कोटींच्या वर गेली आहे.

  लखनऊ: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संख्येत दिवसागणिक घट होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Govt.) यांनी येत्या रविवारी म्हणजेच रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) सणानिमित्त लॉकडाऊन (Lockdown) विषयी मोठा निर्णय घेतला आहे. यूपी पूर्णपणे अनलॉक होणार आहे. तसेच विकेंड लॉकडाऊन सुद्धा उठवण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  यूपीमध्ये कोरोना लसीकरणात तेजी

  यूपीमध्ये कोव्हिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्रेसिव ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटसोबतच कोरोनावरील लसीकरण अभियानाला चांगलीच गती मिळाली आहे. तसेच राज्यात 7 कोटी 1 लाख 69 हजारपेक्षा जास्त कोव्हिडचे नमुने आढळले आहेत. त्याचप्रमाणे 6 कोटी 24 लाख पेक्षा जास्त व्हॅक्सिन येथील नागरिकांनी घेतली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 1 कोटींच्या वर गेली आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरात कोरोना व्हक्सिनच्या 57 कोटी 22 लाख 81 हजार 488 डोस पूर्ण झाल्या आहेत.

  मागील 24 तासांत 407 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

  मागील 24 तासांत उत्तर प्रदेशमध्ये 407 इतक्या नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरूवारी राज्यात 25 रूग्ण आढळून आले होते. त्यामधले 35 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोव्हिड-19 मुळे 17.09 लाख पेक्षा जास्त रूग्ण संक्रमित झाले आहेत.

  विकेंड लॉकडाऊन उठवलं

  उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन उठवण्यात  येणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहरांमध्ये आणि बाजारांमध्ये साप्ताहिक बंदी उठवण्यात येणार आहे. दरम्यान, या संदर्भातील गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात येणार आहे.