आग्र्यातील मुघल संग्रहालयाला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे’ नाव

“गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जय हिंद जय भारत' असे योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल. असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.   

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा विभागातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालय हे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ नावे (Renamed Agra’s Mughal Museum as Chhatrapati Shivaji Maharaj) तयार होईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

“गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जय हिंद जय भारत’ असे योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल. असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योगी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘।। जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय !’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरुन केली आहे.

आग्रा येथील ताजमहाल या वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचं बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. .