योगी सरकारचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशमध्ये कर्फ्यूमध्ये वाढ

उत्तर प्रदेशात(Curfew in Uttar Pradesh) कोरोनाची स्थिती पाहता योगी सरकारने कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत लावण्यात आलेला कर्फ्यू (Curfew extended till 10th may)१० मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

    भारतात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात(Curfew in Uttar Pradesh) कोरोनाची स्थिती पाहता योगी सरकारने कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत लावण्यात आलेला कर्फ्यू (Curfew extended till 10th may)१० मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

    याआधी ३ मे च्या सकाळपर्यंत लावण्यात आलेला कर्फ्यू ६ मे पर्यंत वाढवण्यात आला होता. पण आता त्यात १० मे रोजी सकाळी ७ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

    योगी सरकारने मार्केट परिसरात कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक कामांवर कोणतेही बंधन नाही. मात्र वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. येत्या दोन आठवड्यांपर्यंत रोडवेजच्या बसेस राज्याबाहेर जाणार नाहीत. आठवडी बाजारपेठा बंद राहतील. बाजारपेठांमध्येही दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या दरम्यान, लोकांना अनावश्यकपणे बाहेर जाण्यास मनाई असणार आहे. उड्डाणांवरही काही निर्बंध आहेत.