Live in Relationship Now what is the court order; Then, even parents cannot prevent 'them' from living together

महिलेसोबत फरार झालेला मुलगा हा सातव्या वर्गात शिकतो. त्याचे महिलेसोबत गेल्या काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. तेच मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की, महिलेनेच त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेले. मुलाच्या कुटुंबियांनीही पोलिसात तक्रार दिली आहे. आता पोलिस दोघांचाही शोध घेत आहेत.

    लखनौ : उत्तर प्रदेशमधून दररोज अनेक विचित्र घटना वाचायला आणि ऐकायला मिळतात. आता अशीच एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील ही खळबळजनक घटना आहे. इथे तीन मुलांची आई असलेली महिला आपल्या सातवीतील प्रियकरासोबत फरार झाली आहे. ज्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसात यावरून तक्रार दिली आहे. पोलिस दोघांचाही शोध घेत आहेत.

    गोरखपूरच्या कॅम्पियरगंज गावातील एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. यात त्याने म्हटले आहे की, त्याची पत्नी गावातील एका अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे. पीडित व्यक्तीने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून पत्नीचे गावातील एका 14 वर्षीय मुलासोब अफेअर सुरू होते. त्यामुळे ती पतीपासून दूर राहू लागली होती. पत्नीच्या वागण्यावरून पतीला संशय आला. यावरून दोघांमध्ये वाद होत होता.

    महिलेच्या पतीने सांगितले की, महाशिवरात्रीच्या दिवशी गावात जत्रा भरली होती. या जत्रेत ती तिच्या प्रियकरासोबत गेली होती. पण ती रात्री उशीरापर्यंत घरी परतलीच नाही. त्यानंतर आजूबाजूला तिचा शोधही घेतला. पण तिचा पत्ता काही लागला नाही. मिळालेल्या माहितीनुसार महिला तीन लेकरांची आई आहे.