मास्कविना फिरणाऱ्या तरुणाच्या हातापायांवर ठोकले खिळे, कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस मोकाट

बरेलीच्या बारादरी पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या रणजीतच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, रणजीत रात्री दहाच्या सुमारास घराबाहेर बसला होता. गस्तीवर असलेले पोलीस आले आणि ते रणजीतवर तुटून पडले. पोलिसांनी रणजीतला उचलले आणि पोलीस ठाण्यात नेले, आणि तिथे त्याच्या हातावर आणि पायांवर खिळे ठोकण्यात आले. यावेळी पोलिसांनी रणजीतला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

    लखनौ- कोरोनाच्या काळात उ. प्रदेश पोलिसांचा क्रूर चेहरा समोर येतो आहे. तीन जिल्ह्यात निरनिराळ्या घटनांमध्ये क्रूरतेच्या मर्यादाच पोलिसांनी ओलांडल्या आहेत. पहिले प्रकरण बरेलीतील आहे. इथे मास्कविना फिरणाऱ्या तरुणाच्या हातावर आणि पायावर पोलिसांनी खिळे ठोकल्याचा आरोप आहे. तर दुसऱ्या घटनेत रायबरेलीत ५ तरुणांना रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. तिसऱ्या घटनेत मऊमध्ये मास्क न घालणाऱ्या तरुणाला रस्त्याने मारत पोलीस चौकीत आणण्यात आल्याची घटना घडली आहे.

    बरेलीच्या बारादरी पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या रणजीतच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, रणजीत रात्री दहाच्या सुमारास घराबाहेर बसला होता. गस्तीवर असलेले पोलीस आले आणि ते रणजीतवर तुटून पडले. पोलिसांनी रणजीतला उचलले आणि पोलीस ठाण्यात नेले, आणि तिथे त्याच्या हातावर आणि पायांवर खिळे ठोकण्यात आले. यावेळी पोलिसांनी रणजीतला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

    या प्रकरणी रणजीतची आई शीला देवी हिने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे, मात्र पोलीस अधिकारी रोहित सजवाण यांनी हे आरोप फेटाळले आहेत. रणजीतने पोलिसांशी अयोग्य वर्तणूक केली, तो मास्कविना घराबाहेर फिरत होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अटक टाळण्यासाठी हे सर्व नाटक रचल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, त्यानेच स्वताच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.