up woman commissioner chief meena kumari

उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी(Meena Kumari) यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

    उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी(Meena Kumari) यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. अलीगड आणि प्रदेशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मीना कुमारी यांनी समाजातील मुलींवरही लक्ष ठेवायला हवं असे म्हटले आहे. मीना कुमारी यांनी मुलींच्या मोबाईल वापरण्यावरही टी(Use Of Mobile) केली आहे.

    मुली मोबाईलवर बोलत असतात आणि हे प्रकरण लग्न करण्यासाठी पळून जाण्यापर्यंत पोहोचतं, असं वक्तव्य मीना कुमारी यांनी केली आहे. अलिगढ आणि उत्तर प्रदेशात बलात्काराच्या वाढत्या घटनांसंदर्भात पत्रकारांनी मीना कुमारी यांना प्रश्न विचारला होता. त्यावर कठोरपणे कारवाई केली जात असल्याचे त्यांनी म्हटलं. आपल्या लोकांसोबत समाजालासुद्धा यावर काम करावे लागेल असेही त्या म्हणाल्या.

    आपल्या मुलींकडेही पाहायला हवं की, त्या कुठे जातात आणि कोणासोबत बसतात. मोबाईलकडेही पाहायला हवं. सगळ्यात आधी मी सगळ्यांनी सांगते की मुली मोबाईलवर बोलतात आणि प्रकरण एवढ्या लांबपर्यंत पोहोचतं की लग्न करण्यासाठी ते पळून जातात, असे मीरा कुमारी म्हणाल्या.

    काल माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं. वेगळी जात असलेले मुलगा आणि मुलगी माझ्याकडे आले होते. त्यांनी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. गावातल्या पंचायतीने त्यांना गावात घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे मी विनंती करते की मोबाईल देऊ नका. जर दिला तर पूर्ण लक्ष ठेवा. मी मुलांच्या आईला सांगते की, मोबाईल दिला तर त्याच्यावर लक्ष ठेवा. आईच्या निष्काळजीपणामुळेच मुलींचे हे हाल होतात, असे मीना कुमारी म्हणाल्या.

    उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. मी फक्त मुली नाही तर मुलांच्या बाबतीतही ते वक्तव्य केलं होतं. अल्पवयीन मुलांचे आणि मुलींचे मोबाईल त्यांच्या कुटुंबियांनी वेळोवेळी तपासायला हवेत असे मीना कुमारी म्हणाल्या.