trivendra singh rawat

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा(jp nadda) यांच्या सोबतच्या बैठकीनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत(trivendra singh rawat resignation) यांनी राजीनामा दिला आहे. उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.

    उत्तराखंड विधानसभा निवडणुकीआधीच(uttarakhand election) राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सोबतच्या बैठकीनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत(trivendra singh rawat resignation) यांनी राजीनामा दिला आहे. उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.

    मुख्यमंत्री रावत यांनी सोमवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती.त्याआधी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली. नड्डांसोबत त्यांची ४० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.

    मुख्यमंत्री रावत आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यातील बैठकीला राजकीय पार्श्वभूमी आहे. जेव्हा भाजपा उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम हे कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना देहरादूनला पोहचले आणि राज्याच्या कोर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली होती. यानंतर या दोघांनी देखील आपला अहवाल भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता. त्यामुळे राजीनामा दिला गेला असावा , असा अंदाज आहे.