faiyaaz basha

फैयाज बाशा(faiyaz basha) यांनी रायचोटी नगरपालिकेच्या(raychoti municipal council) मागच्या निवडणूकांसाठी पक्षाच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता आणि व्हायआरसीच्या उमेदवाराला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. म्हणूनच पक्षाने बाशा यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.

    हैदराबाद: भगवान देता है तो छप्पर फाड के! हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. असाच काहीसा प्रकार एका भाजी विक्रेत्यासोबत घडला आहे. फैयाज बाशा नावाच्या माणसाला भाजीवाल्यापासून नगर पालिकेचा अध्यक्ष बनण्यासाठी फक्त काही आठवडे लागले आहेत. बाशा एक पदवीधारक असून चांगली नोकरी न मिळाल्याने पैसे मिळविण्यासाठी त्याने भाजी विकण्याचे ठरविले. पण जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते वायएसआरसीपी या राजकीय पक्षाचे काम करायचे. आपली मेहनत आणि कष्टाच्या जोरावर ते भाजीवाल्यापासून एक नगरपालिकेचे अध्यक्ष बनले आहेत.

    बहुमताने जिंकले निवडणूक
    बाशा यांनी रायचोटी नगरपालिकेच्या मागच्या निवडणूकांसाठी पक्षाच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता आणि व्हायआरसीच्या उमेदवाराला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. म्हणूनच पक्षाने बाशा यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. लोकांनी बाशा यांना बहुमताने निवडून देऊन पक्षाचा निर्णय योग्य ठरल्याचे दाखवून दिले आहे. चांगल्या बहुमताने जिंकून बाशांनी स्वतःचे नाव कमावले आहे.

    मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
    या दमदार विजयानंतर बाशा म्हणाले की, “मी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी माझ्यासारख्या भाजीविक्रेत्याला पालिकेचा अध्यक्ष बनण्यास पात्र समजले. पदवी असूनही चांगली नोकरी नसल्याने बेरोजगारीमुळे मला जीवन जगण्यासाठी भाज्या विकाव्या लागत होत्या. पण आता मला माझी दिशा सापडली असून मी योग्य दिशेने वाटचाल करेन.”