कोरोना नियमांचे उल्लंघन; 150 लोकांविरोधात खटला दाखल

कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करत जिल्ह्यात रोड शो करण्याच्या आरोपावरून आझाद समाज पक्षाचा नेता चंद्रशेखर आझादसहित 150 लोकांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

    मुजफ्फरनगर : कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करत जिल्ह्यात रोड शो करण्याच्या आरोपावरून आझाद समाज पक्षाचा नेता चंद्रशेखर आझादसहित 150 लोकांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

    हा रोड शो चरथावल पोलिस ठाणेक्षेत्रात करण्यात आला होता. आझाद व त्यांच्या समर्थकांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

    भीम आर्मी अध्यक्षाने पंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनासाठी हा रोड शो आयोजित केला होता. हा रोड शो अनेक गावांमध्ये करण्यात आला होता.