बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस

आजच्या निवडणुकीच्या टप्प्यात सहा जिल्ह्यांतील ४५ जागांवरील ३४२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात हिंसक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांना विशेष सूचना दिल्या गेल्या आहेत.

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये, अशा कठीण परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच मतदानाची प्रक्रिया पार पडत असावी अशी स्थिती आहे. आज (ता.१७) सकाळी सात वाजता सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी ६.३० पर्यंत सुरू राहणार आहे. आजच्या निवडणुकीच्या टप्प्यात सहा जिल्ह्यांतील ४५ जागांवरील ३४२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात हिंसक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांना विशेष सूचना दिल्या गेल्या आहेत.

    मतदान केंद्रावर कोविड नियमांचे पालन केले जात असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे, परंतु बुथांबाहेर रांगा लावून उभे असलेले लोक सामाजिक अंतरांच्या नियमांनुसार दिसत नाहीत. बंगालमध्ये विधानसभा निवडणू आठ टप्प्यात होणार आहे, त्यापैकी चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे, पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे. उर्वरित तीन टप्प्यांसाठी २२, २६ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

    तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा पाचव्या टप्प्यात कस लागणार आहे. पाचव्या टप्प्यात ४५ जागांचा फैसला होणार आहे.