प. बंगालमध्ये हिंसाचार – हिंसाचारात आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू,पंतप्रधानांनी केली राज्यपालांशी चर्चा

नंदीग्राममध्ये महिलांच्या विरोधात झालेल्या हिंसेची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून, आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तयास करण्यासाठी लवकरच आयोगाचे पथक राज्याचा दौरा करणार आहे.

  कोलकाता – विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर प. बंगालमधअये राजकीय हिंसाचाराला सुरुवनात झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाल्य़ानंतर, राज्यात आता सत्ताधआरी टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमकी सुरु झाल्या आहेत. आत्तापर्यंत सहा जिल्ह्यांमध्ये अशा हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले असून, यात आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

  या सर्व प्रकरणाबाबत केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत राज्यपाल जगदीश धनखड यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. प. बांगलमधील हिंसाचार आणि हत्यासत्राबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे या हिसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे, केंद्र सरकारने हिंसाचार थांबवण्यासाठी प. बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षादले तैनात करावीत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थआ टिकून राहण्यासाठी सुप्रीम कोर्टाने याबाबतचे आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एवढी असहिष्णूता – जे पी नड्डा

  या सर्व परिस्थितीची माहिती घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मंगळवारी कोलकात्याला पोहोचले आहेत. ते दोन दिवस बंगालमधील हिंसाचार झालेल्या परिसरात दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. निकालांनंतर बंगालमध्ये ज्या हिसांचाराच्या घटना ऐकत आहे, त्या हैराण करणाऱ्या आणि चिंताजनक आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटना फाळणीच्या वेळी घडल्या होत्या, असे आपण ऐकले आहे, मात्र स्वतंत्र भारतात आजपर्यंत एवढी असहिष्णूता पाहिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  ज्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत हेत, त्यांना प्रत्यक्ष भेटून धीर देण्याचे आणि या अवघड परिस्थितीत लोकशाही मार्गाने ही लढाई लढण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या कार्यकर्त्यांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, त्यांच्या विचारधारेची लढाई आम्ही निर्णायक वळणावर नेऊ, असेही नड्डा म्हणाले आहेत. नड्डा, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी गोपाळनगरमध्ये हिंचाचारातील पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिली.

  राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलीस महासंचालकांना पत्र

  नंदीग्राममध्ये महिलांच्या विरोधात झालेल्या हिंसेची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून, आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तयास करण्यासाठी लवकरच आयोगाचे पथक राज्याचा दौरा करणार आहे.

  सुप्रीम कोर्टात भाजपा, सीबीआय चौकशीची मागणी

  बंगाल हिसांचारप्रकरणी भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. बंगालमधील बलात्कार, हत्या, हिंसाचारप्रकरणांची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. त्यातबरोबर घडलेल्या घटनांनंतर केलेल्या कारवाईचा स्टेटस रिपोर्ट कोर्टात सादर व्हावा, अशीही मागणी केली आहे.

  केंद्रीय दलांनी कार्यकर्त्यांवर अत्याचार केला- ममता

  प. बंगालमधील हिसांचारांच्या बातम्यांनंतर, राज्यात शांततेचे आवाहान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. केंद्रीय दलांनी निवडणुकांमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निकालांनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचेही ममता यांनी सांगितले आहे. हे सर्व घडत असतानाही तृणमूलच्या कार्यकर्त्यांना संयम बागळगण्याचे सांगण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

  तृणमूलच्या आशीर्वादाने हिंसाचार- भाजपा
  प. बंगालमधील हिंसाचाराला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तृणमूलच्या गुंडांना हिसांचारासाठी आणि धुडगूस घालण्यासाठी ममता बॅनर्जी यांची मूक सहमती असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. हा हिसांचार एकदम घडलेला नाही, तर तृणमूल पुरस्कृत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

  निवडणूक प्रचारात भाषणावेळी, निवडणूक संपली की सीआरपीएफ परत जाईल, त्यावेळी तृणमूलची वेळ असेल, असे ममता बॅनर्जी सांगत असत. आत्ता जे घडते आहे, ते संपूर्म देश पाहतो आहे, असे पात्रा यांनी म्हटले आहे. जोपर्यंत राज्यातील हिंसाचार थांबत नाही तोपर्यंत शपथविधी सोहळ्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही भाजपाकडून करण्यात आली आहे.

  २ मे पासून सुरु असलेल्या हिंसाचारात ११ जणांचा मृत्यू

  रविवारी निकालानंतर संध्याकाळपासून राज्यात हिसंचाराच्या घटना घडल्या असून, त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात ९ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. तर एका तृणमूलच्या कार्य़यकर्त्याचा तर एका आयएसएफच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने प. बंगाल सरकारकडू अहवाल मागवला आहे.