hathras gang rape police

योगी सरकारने माध्यमांना परवानगी दिल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही. आम्हाला यूपी पोलिसांवर विश्वास नाही. पोलिसांनी परिवाराला मारहाण केली, असल्याचा आरोप पीडितेच्या बहिणीनं केला आहे. तसेच पीडितेच्या आईनं देखील आमचा योगी सरकारवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस  (Hathras gang rape) येथील घटनेनंतर संपूर्ण देशभरातील लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा (Police) मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणतीही राजकीय व्यक्ती, माध्यमांना पीडित कुटुंबाला भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर सर्वस्तरावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र आता योगी आदित्यनाथ सरकारने माध्यमांना हाथसरमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे.

आरोपींना फाशी देण्याची मागणी होत असताना या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. योगी सरकारने माध्यमांना परवानगी दिल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही. आम्हाला यूपी पोलिसांवर विश्वास नाही. पोलिसांनी परिवाराला मारहाण केली, असल्याचा आरोप पीडितेच्या बहिणीनं केला आहे. तसेच पीडितेच्या आईनं देखील आमचा योगी सरकारवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.

तसेच आम्हाला कुणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये, अशी तंबी देखील दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. त्याचप्रमाणे गावातल्या काही जणांची भीती वाटत आहे. गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील, असा खळबळजनक आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे.

हाथरस प्रकरणाची अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून दखल घेतली असून, याबाबत १२ ऑक्टोबरपर्यत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश राज्यातील गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि हाथरसच्या पोलिसांना दिले आहेत.