पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’ होणार, भाजपमध्ये गळती सुरू…

सौमेन रॉय हे कालियागंज मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. भाजप आमदार सौमेन रॉय बंगाल आणि उत्तर बंगालच्या विकासासाठी पुन्हा तृणमुल काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. त्यांना बंगालची संस्कृती आणि वारसा अबाधित ठेवायचा आहे, असं टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी म्हणाले.

    पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सौमेन रॉय यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बंगालमध्ये ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार असून ३ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. समसेरगंज, भवानीपूर आणि जंगीपूर या तीन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

    सौमेन रॉय हे कालियागंज मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. भाजप आमदार सौमेन रॉय बंगाल आणि उत्तर बंगालच्या विकासासाठी पुन्हा तृणमुल काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. त्यांना बंगालची संस्कृती आणि वारसा अबाधित ठेवायचा आहे, असं टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी म्हणाले.

    सौमेन रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे विधानसभेत भाजप आमदारांची संख्या ७१ ने कमी झाली आहे. गेल्या चार आठवड्यांत भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये गेले आहेत.पोटनिवडणुकीच्या घोषणेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तसेच मतमोजणी ०३ ऑक्टोबर रोजी केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.