भारतातील गरीब भुकेला आहे कारण..,भूकबळीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी?

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये (Global Hunger Index) भूकबळी प्रकरणात १०७ देशांपैकी भारताला (India) ९४ व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षा मागे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये (Global Hunger Index) भूकबळी प्रकरणात १०७ देशांपैकी भारताला (India) ९४ व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षा मागे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भारतातील गरीब भुकेला आहे कारण सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारत भूकबळीच्या अशा स्तरावर आहे, जो गंभीर मानला जातो. GHI 2014मध्ये ५५ व्या स्थानावर होते. भारत २०१९ मध्ये १०२ स्थानावर आला आहे. यादीतील देशांची टक्केवारी दरवर्षी कमी-जास्त होत असल्याचे दिसते. कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात.