नेमकं काय चुकलं? नेमकी कुठे गफलत झाली? भाजपच्या पराभवाची दहा प्रमुख कारणे

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूलने आघाडी घेतल्यामुळे बंगालमध्ये पुन्हा एकदा ममताराज येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये १५० च्या वर जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजपाला त्याच्या अर्ध्या जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजविला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचे दिसून आले. पण या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. यामागची कारणे जाणून घ्यायला हवीत.

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूलने आघाडी घेतल्यामुळे बंगालमध्ये पुन्हा एकदा ममताराज येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये १५० च्या वर जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजपाला त्याच्या अर्ध्या जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजविला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचे दिसून आले. पण या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. यामागची कारणे जाणून घ्यायला हवीत.

    भाजपाच्या अपयशामागे मागील वर्षीचा लॉकडाऊन, देशातील कोरोना स्थिती, निवडणुकासाठी आखलेली रणनिती कारणीभूत आहे. भाजपाने गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी जरी केली असली तरी त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

    भाजपच्या पराभवाची दहा प्रमुख कारणे

    १. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा कामगार वर्गाला बसला आहे. या काळात लॉकडाऊन लागल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. अनेकांचा रोजगार गेला.
    २. भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केलेला एकेरी हल्ला कदाचित मतदारांना पटला नाही.
    ३. सब कुछ मोदी’ असलेल्या भाजपच्या मोदी ब्रँडमुळे जागा वाढल्या पण भाजपाला सत्ता मात्र मिळू शकली नाही.
    ४. भाजपाला स्थानिक नेतृत्व नसल्याचा मोठा फटका बसला. त्या उलट ममता बॅनर्जींचे करारी नेतृत्व लोकांनी मान्य केल्याचे पहायला मिळते.
    ५. ‘खेला होबे’ ला बंगालच्या मतदारांनी कौल दिला. ‘खेला होबे’ ही ममता बॅनर्जींची घोषणा होती.
    ६. ‘दीदी ओ दीदी’ असा भाजपाने एकेरी प्रचार केला. तो प्रचार लोकांच्या काही पचनी पडला नाही. त्यामुळे मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून तो धुडकावला.
    ७. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी वर्ग भाजपावर नाराज होता.
    ८. दीदींच्या परप्रांतीय टिप्पणीमुळे भाजपाचे नुकसान झाले.
    ९. भाजपने आक्रमक प्रचार केला. तो आक्रमकपणा बंगालच्या मतदारांना भावला नसल्याचे स्पष्ट झाले.
    १०. – देशातली कोरोना स्थिती ज्या पद्धतीने केंद्र सरकारने हाताळली त्यावर पश्चिम बंगालचे मतदार नाराज असल्याचे स्पष्ट झाले. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारमधील बडे नेते मात्र निवडणुकीच्या कामात जास्त लक्ष घालत होते. याचीही दखल बंगालमधील मतदारांनी घेतली आहे, असे लक्षात येते.