What happened in UP, Bihar is also happening in Uttarakhand; After the Ganges, bodies were now found on the banks of the river Sharu

गंगेनंतर आता शरयू नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळले आहेत. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात बुधवारी नदीकिनारी अनेक मृतदेह तरंगताना दिसले. हे सर्व मृतदेह कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेले नागरिक असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. यापूर्वी उत्तरप्रदेश व बिहारमध्ये गंगा नदीच्या किनारी अनेक मृतदेह सापडले होते. त्यानंतर इतर अनेक भागातील नद्यांमध्ये मृतदेह वाहू आल्याचे आढळले होते. हे सर्व मृतदेह कोरोनाने जीव गेलेल्या लोकांचे असल्याचे मानण्यात येत आहे.

    पिथौरागढ : गंगेनंतर आता शरयू नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळले आहेत. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात बुधवारी नदीकिनारी अनेक मृतदेह तरंगताना दिसले. हे सर्व मृतदेह कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेले नागरिक असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. यापूर्वी उत्तरप्रदेश व बिहारमध्ये गंगा नदीच्या किनारी अनेक मृतदेह सापडले होते. त्यानंतर इतर अनेक भागातील नद्यांमध्ये मृतदेह वाहू आल्याचे आढळले होते. हे सर्व मृतदेह कोरोनाने जीव गेलेल्या लोकांचे असल्याचे मानण्यात येत आहे.

    संक्रमणाची भीती

    शरयू नदीत अनेक मृतदेह सापडल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकांममध्ये या घटनेमुळे भीती पसरली आहे. ज्याठिकाणी मृतदेह सापडले आहेत, तेथून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर जिल्हा मुख्यालय आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यासाठी नदीच्या पाण्याचाच उपयोग करण्यात येतो. लोकांना भीती आहे की, पाणी दूषित झाल्यामुळे संक्रमण आणखी वेगाने पसरू शकते.

    अनेक प्रश्न उपस्थित

    याचप्रकारची दृश्ये या महिन्याच्या सुरुवातीला उत्तरप्रदेश व बिहारमध्ये गंगा नदीत पाहायला मिळाली होती. या राज्यांमध्ये मोठ्या संख्येत मृतदेह गंगा नदीच्या किनारी तरंगताना आढळले होते. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये गंगेच्या किनारी शेकडो मृतदेह मिळाल्यानंतर या प्रकरणात दखल दिली होती. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना गंगा व तिच्या उपनद्यांमध्ये मृतदेह प्रवाहित करण्यावर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मृतदेहांचे सुरक्षित व सन्मानपूर्वन अग्निसंस्कार करण्याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले होते.