How can the election symbol be the party's 'logo'? sj

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आमदारही प्रभाग प्रमुख झाले होते. भाजपच्या विजयाचे गमकही कदाचित याच रणनीतीत दडले असावे. मग तो पंतप्रधान ही का नसो, परंतु सर्वप्रथम तो कार्यकर्ताच आहे.

अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी अद्याप दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे परंतु आगामी निवडणुकीत विजय मिळविण्याच्या उद्देशोन भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी आतापासूनच पन्ना प्रमुखाची रणनीती आखणे सुरू केले आहे. पाटील यांना बूथ क्रमांक ३८ च्या प्रभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की प्रत्येक बूथवर नियुक्त करण्यात आलेला प्रभाग प्रमुख कमीत कमी पाच जणांना सदस्य करीत असतो. उल्लेखनीय असे की पाटील यांनी राज्यात मिशन १८२ चे लक्ष्य निश्चित केले आहे.

५० हजार बूथ
भाजपच्या रणनीतीनुसार, गुजरात विधानसभेत ५० हजार बूथ आहेत आणि १५ लाख प्रभाग प्रमुखांची नियुक्ती केली जाते. प्रत्येक प्रभागात ३० मतदार थेट संपर्कात असतात. १५ लाख प्रभाग प्रमुखांनी प्रत्येकी पाच जणांची लहान समितीही गठित केली तरी ७५ लाख सदस्य होतात. यात त्यांच्या घरातील तीन सदस्यांचाही समावेश केला तर या समीकरणानुसार अडीच कोटी मतदातर थेट भाजपच्या संपर्कात येतात.

कार्यकर्त्यांची एकजूट सुरू 
पाटील यांच्या प्रभाग प्रमुख असलेल्या रणनीतीत युवकांचा समावेश केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आमदारही प्रभाग प्रमुख झाले होते. भाजपच्या विजयाचे गमकही कदाचित याच रणनीतीत दडले असावे. मग तो पंतप्रधान ही का नसो, परंतु सर्वप्रथम तो कार्यकर्ताच आहे.

प्रभाग प्रमुखावर दारोमदार
सी.आर. पाटील यांना ज्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपिवण्यात आली होती त्यावेळी त्यांनी १८२ पैकी १८२ विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्याची घोषणा केली व मिशन १८२ यशस्वी करण्यासाठी रणनीतीअंतर्गत प्रभाग प्रमुखावर भर दिला. उल्लेखनीय असे की प्रभाग प्रमुखाचे मॉडेल यशस्वी ठरलेले मॉडेल त्यांनी सर्वप्रथम त्यांच्याच मतदारसंघातून सुरू केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे पाटील यांना देशात सर्वाधिक मते प्राप्त झाली.

सर्व मुद्दे काढले खोडून
सद्यस्थितीत पाटील यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रभाग प्रमुखाच्या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. प्रभाग प्रमुख झाल्यानंतर कार्यकर्त्याला त्याची माहिती सोशल मीडियावर अपलोड करावी तर लागतेच शिवाय जिल्हा व शहर अध्यक्षांच्याही संपर्कात राहावे लागते. त्यामुळेच मिशन १८२ बाबत पाटील किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. तथापि मिशन १८२बाबत पक्षांतर्गत अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहेत. असाच तर्क २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही देण्यात आला होता परंतु दोन्ही वेळेस भाजपाने गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ जागा जिंकून दाखविल्या होत्या.