देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?” ‘या’ अभिनेत्याचा मोदींना सवाल

देशातील निम्म्याहुन अधिक जनता उपाशी असताना नव्या संसद भावनांची गरज काय आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला हसन यांनी सुरुवात केली आहे .

“देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?” असा प्रश्न विचारत मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष व अभिनेते कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. राजधानीत नवीन संसद भावनांच्या कोनोशिला समारंभ नुकताच पार पडला आहे. या भवनाच्या उभारणीसाठी तब्बल एका हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र दुसरीकडे देशातील निम्म्याहुन अधिक जनता उपाशी असताना नव्या संसद भावनांची गरज काय आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला हसन यांनी सुरुवात केली आहे .

काय म्हणाले कमल हसन?
“अर्धा देश उपाशी झोपतो आहे. अशा परिस्थितीत एक हजार कोटींच्या संसद भवनाची गरज काय? कोविड१९ मुळे लोकांनी आपली कामी गमावली आहेत. चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील नेत्यांनी सांगितले की ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की तुम्ही कुणाच्या संरक्षणासाठी नवं संसद भवन बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे कमल हासन यांनी म्हटले आहे.