सरकार आपल्या बाजूने असो वा नसो, भलेही सरकार विरोध करो, पण आपला लढा सुरूच राहील ; योगगुरू बाबा रामदेव

रुग्णालयांत कोरोनावरील उपचारासाठी जी-जी औषधी वापरली जात आहे, त्यांपैकी कुठल्याही एका औषधाचे अद्यापही कोरोनावरील उपचार प्रोटोकॉलअंतर्गत क्लिनिकल ट्रायल झालेले नाही. मग, कोणत्या आधारावर या औषधांचा वापर रुग्णांसाठी केला जात आहे- योगागुरू रामदेव बाबा

    हरिद्वार: योगागुरू रामदेव बाबा यांची वाचाळ वक्तव्य करणे अद्याप थांबलेले नाही. नुकतेच रामदेव बाबा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांचा मजाक उडवला आहे. ज्यांना काही मान नाही असे नाही एक हजर कोटीच्या दाव्याचा मागणी करतायत असे म्हणत बाबा रामदेव यांनी आयएमएवर टीका केली आहे.

    सध्या देशात धार्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक दहशतवाद वेगाने पसरत आहे. यातच आणखी एका नव्या प्रकारच्या ट्रिटमेंट दहशतवादाचीही भर पडली आहे. आपली लढाई त्याविरोधात आहे. ॲलोपॅथिकचा हा उद्योग जवळपास दो लाख कोटींचा आहे. याविरोधात आपण लढत आहोत. सरकार आपल्या बाजूने असो वा नसो, भलेही सरकार विरोध करो, पण आपला लढा सुरूच राहील आणि त्यात आपण यशस्वी होऊ. असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे.

    आमचा कुठल्याही पॅथीसोबत कॉम्पिटिशन नाही, विरोध नाही. आकस्मिक स्थितीत ॲलोपॅथी उपचार आवश्यक असल्याचेही आपण मानतो, मान्यताही देतो. पण याचा अर्थ असा नाही, की केवळ हीच उपचार पद्धती आहे. ॲलोपॅथिक उपचार पद्धतीवर निशाणासाधत ते म्हणाले, आम्ही मानतो, की आपल्याकडे लाइफ सेव्हिंग ड्रग्स आणि ॲडव्हान्स सर्जरी आहे. पण आपल्याकडे या दोन गोष्टी असतील, तर आमच्याकडे ९८ गोष्टी आहेत. आयुर्वेद आणि निसर्गोपचार सर्जरी न करता आणि औषध न घेताच उत्तम आरोग्य देते. आणि १०००हून अधिक व्याधींवर इलाज करते, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला.

    याच वेळी बाबा रामदेव यांनी आरोप केला, की यावेळी देश आणि जगातील विविध रुग्णालयांत कोरोनावरील उपचारासाठी जी-जी औषधी वापरली जात आहे, त्यांपैकी कुठल्याही एका औषधाचे अद्यापही कोरोनावरील उपचार प्रोटोकॉलअंतर्गत क्लिनिकल ट्रायल झालेले नाही. मग, कोणत्या आधारावर या औषधांचा वापर रुग्णांसाठी केला जात आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.