गुजरातच्या सरकारमध्ये मोठा बदल | मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या नेत्याची वर्णी लागणार, मनसुख मंडाविया यांचं नाव चर्चेत ? | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
इतर राज्ये
Published: Sep 11, 2021 05:52 PM

गुजरातच्या सरकारमध्ये मोठा बदलमुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या नेत्याची वर्णी लागणार, मनसुख मंडाविया यांचं नाव चर्चेत ?

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या नेत्याची वर्णी लागणार, मनसुख मंडाविया यांचं नाव चर्चेत ?

हे बदल आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी केल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री बदलल्यानंतर जनतेची नाराजी दूर होऊ शकते आणि त्यांच्या काही नवीन इच्छा-आकांक्षा जागृत होतील. त्यामुळे आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मोठी मदत होईल.

  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी तडखाफडखी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी आता कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना रूपाणी यांनी काळानुसार पक्षातील जबाबदाऱ्या बदलत राहतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायला दिली, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता गुजरातचा विकास नव्या नेतृत्वाखाली सुरू राहिला पाहिजे.

  हे बदल आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी केल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री बदलल्यानंतर जनतेची नाराजी दूर होऊ शकते आणि त्यांच्या काही नवीन इच्छा-आकांक्षा जागृत होतील. त्यामुळे आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मोठी मदत होईल.

  सध्या चार नेत्यांची नावे आघाडीवर

  भाजपाने गांधीनगरमध्ये उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नव्या सीएमची वर्णी लावण्यात येणार आहेत. सध्या चार नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजपा अध्यक्ष सीआर, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया आणि केंद्रीय मत्स्य आणि पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला या चार नेत्यांचा नावाचा सहभाग आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांचे नाव सगळ्यात पुढे अग्रेसर आहे.

  26 डिसेंबर 2017 रोजी रूपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपने गुजरातमध्ये 182 पैकी 99 जागा जिंकून बहुमत मिळवले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रुपाणी यांची विधिमंडळ पक्षाचे नेते आणि नितीन पटेल यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान, गुजरातचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणत्या नेत्याची वर्णी लागणार ?, हे पाहणं आता सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २५ शनिवार
  शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

  महाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.