नदीत सापाला पकडताना कोब्रानं केला मागून हल्ला, अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा…

कर्नाटकातील (Karnataka) एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सध्या तुफान व्हायरल होत आहे. नदीत उतरून हा माणूस प्राण्यांना पडकण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी अचानक कोब्राने मागून हल्ला चढवला.

कोब्रा हा शांत आणि तितकाच जीवघेणा सापचा प्रकार आहे. या कोब्रानं (Cobra Attack Reptile Expert) सर्प तज्ज्ञावर हल्ला केला आहे. कर्नाटकातील (Karnataka) एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सध्या तुफान व्हायरल होत आहे. नदीत उतरून हा माणूस प्राण्यांना पडकण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी अचानक कोब्राने मागून हल्ला चढवला.

नदीत उतरून सर्पतज्ज्ञ प्राण्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी संधी साधत कोब्रानं हल्लाबोल केला. मागे उभ्या असलेल्या माणसानं त्याचे तोंड पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तज्ज्ञ जमीनीवर खाली पडले होते. जर दुसरी व्यक्ती तिथं उपस्थित नसली असती तर क्रोबा यशस्वी झाला असता. दैव बलवत्तर म्हणून या दोघांनी मिळून कोब्रावर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, हा व्हिडिओ ८० हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला असून २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३०० पेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडिओला मिळाले आहेत.