प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एखादा समारंभ, लग्न सोहळयात नृत्य करत असताना, त्रास झाल्यास आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना गुजरातच्या गांधीनगरमध्ये घडली. गरबा खेळताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

गांधीनगर (Gandhinagar).  एखादा समारंभ, लग्न सोहळयात नृत्य करत असताना, त्रास झाल्यास आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना गुजरातच्या गांधीनगरमध्ये घडली. गरबा खेळताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

गांधीनगरच्या रुपल गावामध्ये ही दुर्देवी घटना घडली. कल्पनाबेन गाडवी असे मृत महिलेचे नाव आहे. एका कौटुंबिक विवाह सोहळयात गरबा खेळत असताना कल्पनाबेन यांचा मृत्यू झाला. गरबा खेळताना महिलेला ह्दयविकाराचा झटका आल्याचे या व्हिडीओ फुटेजमध्ये दिसते. अवघ्या काही सेंकदांमध्ये महिलेचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

व्हिडीओ फुटेजमध्ये कल्पनाबेन गरबा खेळताना दिसत आहे. तिचं मूल तिच्याकडे चालत जातं. त्याला ती उचलून घेते आणि तितक्यात खाली कोसळते. त्यावेळी आजूबाजूला गरबा खेळणाऱ्या महिला तिच्या दिशेने धावत जातात. पण काही सेकंदात जागीच तिचा मृत्यू झाला. कल्पनाबेन गाडवीला ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. पण गरबा खेळताना तिला ते समजलं नाही आणि ती जमिनीवर कोसळली असे डॉक्टरांनी सांगितले.