लग्न चालू असताना सहाव्या फेऱ्यानंतर ती थांबली अन् घडलं असं की…

लग्नाचे विधी संपन्न होऊ लागले. नवरा-नवरीनं एकमेकांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही बाजूंनी फोटो काढले. त्यानंतर सात फेरे घेण्यास सुरुवात झाली. सात फेरे सुरु असतानाच नवरी अचानक थांबली आणि तिने लग्नाला नकार दिला. यानंतर रात्री पंचायत बोलावण्यात आली. मात्र हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही तरुणी तिच्या मतावर ठाम राहिली. यावर नवरीला लग्नाला नकार देण्यामागील कारण विचारण्यात आलं त्यावेळी मला नवरा आवडला नाही. त्यामुळे मी लग्न करणार नाही, असं सांगितलं.

    लखनऊ : अनेक वेळा भर मंडपात लग्न तुटल्याच्या घटना समोर येतात. यामागे अनेक कारणं देखील असतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांना कोड्यात पाडलं आहे. उत्तर प्रदेशमधील महोबामध्ये लग्न सुरु असताना सहा फेरे होताच नवरीने जे सांगितलं त्यानं सर्वांना धक्का बसला आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशमधल्या महोबामध्ये झाशीच्या कुलपहाड तहसीलमधील एका गावातून एक वरात आली होती. मुलीकडच्यांनी नवऱ्या मुलाकडच्यांचं जोरदार स्वागत देखील केलं.

    दरम्यान यानंतर लग्नाचे विधी संपन्न होऊ लागले. नवरा-नवरीनं एकमेकांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही बाजूंनी फोटो काढले. त्यानंतर सात फेरे घेण्यास सुरुवात झाली. सात फेरे सुरु असतानाच नवरी अचानक थांबली आणि तिने लग्नाला नकार दिला. यानंतर रात्री पंचायत बोलावण्यात आली. मात्र हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही तरुणी तिच्या मतावर ठाम राहिली. यावर नवरीला लग्नाला नकार देण्यामागील कारण विचारण्यात आलं त्यावेळी मला नवरा आवडला नाही. त्यामुळे मी लग्न करणार नाही, असं सांगितलं.

    मुलीनं सहाव्या फेऱ्यानंतर अचानक लग्न मोडल्यानं नातेवाईक पाहातच राहिले. मला या मुलाशी लग्न करायचं नाही, असं म्हणत तिनं लगीनगाठ सोडली आणि स्वत:च्या खोलीत निघून गेली. त्यामुळे नवऱ्या मुलावर वरात नवरीशिवाय माघारी नेण्याची वेळ आली.