राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव
राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव

चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट लिहीली. यात त्यांनी एक राजा आणि प्रजेची गोष्टी सांगितली. दरम्यान त्यांनी याद्वारे कुणावर निशाना साधला हे स्पष्ट केलेले नाही. तथापि, त्यांच्या पोस्टकडे दिल्लीत सुरू आंदोलनाला उद्देशून असल्याचे पाहिले जात आहे.

रांची (Ranchi).  चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट लिहीली. यात त्यांनी एक राजा आणि प्रजेची गोष्टी सांगितली. दरम्यान त्यांनी याद्वारे कुणावर निशाना साधला हे स्पष्ट केलेले नाही. तथापि, त्यांच्या पोस्टकडे दिल्लीत सुरू आंदोलनाला उद्देशून असल्याचे पाहिले जात आहे.

सुनावनी टळताच केली पोस्ट
चारा घोटाळ्या प्रकरणी शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयात लालू यादव यांच्या जामीनावर सुनावनी होणार होती. परंतु लालूंचे वकील आणि सीबीआयचे अधिवक्त्यांच्या आग्रहानंतर सुनावनी 6 आठवड्यांकरिता टळली. लालू यादव यांना या प्रकरणी जामीन मंजूर झाल्यास ते कारागृहाबाहेर असतील. तथापि, सुनावनी टळल्याने त्यांना कारागृहातच राहावे लागणार आहे. दरम्यान लालूंनी ही पोस्ट लिहिली आहे.

काय आहे गोष्ट?
एकदा एका राजाला हे जाणून घेण्याची इच्छा झाली की त्यांच्या प्रजेमध्ये जागरूक आणि सजग नागरिकांची संख्या किती आहे. त्यांनी याबाबत आपल्या सल्लागारांना सूचना दिल्या. कुणी सल्ला दिला की तुम्ही संपूर्ण प्रजेवर 1 रुपये टॅक्स लावा. राजा हा सल्ला चांगला वाटला. राजाने आदेश दिला की या तारखेच्या आत 1 रुपये टॅक्स जमा करावा. राजाला वाटले की जागरूक आणि सजग नागरिकांना आदेशाबाबत माहिती असणार आणि ते तक्रारही घेऊन येतील. आदेश हटविण्याची मागणी करतील. मात्र कुणीच पुढे आले नाही. सर्व नागरिक टॅक्स देत आहेत कुणालाच काही फरक पडत नाही, असा निष्कर्ष राजाने काढत टॅक्स वाढविला. तरीसुद्धा नागरिक टॅक्स देतच होते, कुणीच याचा विरोध करीत नव्हता.