Ganga shores of liquor; Police raid liquor mafia in Bihar

वाराणसीत अचानक गंगा नदीचे पाणी हिरव्या रंगाचे दिसू लागले आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गंगेच्या पाण्याला हिरवा रंग का प्राप्त झाला? हे शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची एक टीमही गठीत करण्यात आली. येत्या तीन दिवसांत अधिकारी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

    वाराणसी : वाराणसीत अचानक गंगा नदीचे पाणी हिरव्या रंगाचे दिसू लागले आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गंगेच्या पाण्याला हिरवा रंग का प्राप्त झाला? हे शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची एक टीमही गठीत करण्यात आली. येत्या तीन दिवसांत अधिकारी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

    खिडकिया घाटापासून मिर्झापूरपर्यंत गंगेचे पाणी ठिकठिकाणी हिरव्या रंगाचे आढळून आले. मंगळवारी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून ही तपासणी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी पहिल्यांदा गंगेचे पाणी हिरव्या रंगाचे होत असल्याचे समोर आले होते.

    गेल्या 20-25 दिवसांपासून गंगेचे पाणी हिरव्या रंगाचे झाले. ठिकठिकाणी शेवाळही आढळले आहेत. मीडियातून ही गोष्ट समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली. 10 जूनपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यासंबंधी आपला विस्तृत अहवाल सोपविण्याची शक्यता आहे.

    हे सुद्धा वाचा