ममता बॅनर्जींवरील हल्ल्याबाबत मोदी-शाह शांत का? तृणमूल काँग्रेस आक्रमक

ममता बॅनर्जींवर हल्ला झाला, त्यावेळी तिथली सुरक्षा व्यवस्था कमी होती. पोलिस त्या ठिकाणी का उपस्थित नव्हते, असा सवाल तृणमूलनं उपस्थित केलाय. ममता बॅनर्जींवर नंदीग्राममध्ये झालेला हल्ला हा अपघात नसून मुद्दाम केलेला कट असल्याचा आरोप त्यांनी केलाय. एवढं होऊनही मोदी आणि शाह गप्प का, असा सवाल तृणमूल काँग्रेसने केलाय. 

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या हल्ल्यावरून चांगलंच रान पेटलंय. तृणमूल काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून काही सवाल उपस्थित केलेत. यामुळे बंगालच्या प्रचारात ममता बॅनर्जींवरील हल्ल्याचा मुद्दा जोरदार गाजणार, हे आता स्पष्ट झालंय.

    ममता बॅनर्जींवर हल्ला झाला, त्यावेळी तिथली सुरक्षा व्यवस्था कमी होती. पोलिस त्या ठिकाणी का उपस्थित नव्हते, असा सवाल तृणमूलनं उपस्थित केलाय. ममता बॅनर्जींवर नंदीग्राममध्ये झालेला हल्ला हा अपघात नसून मुद्दाम केलेला कट असल्याचा आरोप त्यांनी केलाय. एवढं होऊनही मोदी आणि शाह गप्प का, असा सवाल तृणमूल काँग्रेसने केलाय.

    ममता बॅनर्जी या देशातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर हा हल्ला होऊनही केंद्र सरकार शांत आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी यावर कारवाई किंवा चौकशी करणे सोडाच, साधी प्रतिक्रियादेखील दिलेली नाही किंवा या घटनेबाबत खेदही व्यक्त केलेला नाही, हे आश्चर्यजनक असल्याचं तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय.

    ममता बॅनर्जींवर हल्ला होणं आणि त्या संधीचा फायदा घेत केंद्र सरकारनं डीजी आणि एडीजी बदलणं, या निव्वळ योगायोग नसल्याची टीका तृणमूलनं केलीय. तर भाजपनं या हल्ल्याला राजकीय स्वरूप देणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया याअगोदरच दिलीय. थोडक्यात, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींवरील हल्ल्याचा मुद्दा जोरदार गाजणार आणि तृणमूलकडून या मुद्द्याला जोरदार हवा दिली जाणार, हे निश्चित.