पतीचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर पत्नीला बसला जबर धक्का, गळफास घेऊन केली आत्महत्या – घटना समजताच पाणावले अनेकांचे डोळे

एका बाईच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर पत्नीने देखील आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं.(wife committed suicide after husband`s death) इंदूर शहरातील राजेंद्र नगर येथील सेंच्युरी पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

    भोपाळ : मध्य प्रदेशच्या(madhya pradesh) इंदूर शहरात काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका बाईच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर पत्नीने देखील आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं.(wife committed suicide after husband`s death) इंदूर शहरातील राजेंद्र नगर येथील सेंच्युरी पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

    या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव नेहा पवार आहे. तर तिच्या मृत पतीचं नाव पवन पवार आहे. आत्महत्या करणाऱ्या नेहाचं वय अवघं ३४ वर्ष होतं.तसेच तिचा पती पवनचंही अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झालं.कोरोनामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.

    नेहा आणि पवन गेल्या १८ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी ५ वर्षांपूर्वी  लग्न करुन आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. नेहा एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नोकरी करत होती. पवन नुकताच पीएससीची परीक्षा पास झाला होता. त्याची रेंजरच्या पदासाठी निवड झाली होती. पण कोरोना संकटामुळे त्याची नियुक्ती रखडली होती. येत्या काही दिवसांमध्ये तो कामावर रुजू होणार होता. मात्र १९ एप्रिलला त्याचे कोरोनामुळे निधन झाले.

    पवन याच्यावर भंवरकुआ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सलग सात-आठ दिवसांच्या उपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उपचारादरम्यान बुधवारी सकाळीच त्याचा मृत्यू झाला. पवनच्या मृत्यूची बातमी कळताच नेहावर दु:खाचा डोंगर कोसळला. संसाराच्या अर्ध्या वाटेवरच पतीच्या जाण्याने ती आतून पूर्णपणे खचली. तिने या कठीण काळात इतक्या दिवसांपासून राखलेला संयम सोडला आणि आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं.

    पवनच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक बडवानी येथून तर नेहाचे नातेवाईक बिलासपूर येथून इंदूरला दाखल झाले. पवनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला बडवानी येथे घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली होती. त्यावेळी नेहा कपडे घेऊन येते, असं सांगून नेहा तिच्या घरी गेली. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.