बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा – लग्नानंतर पंधरा दिवसांतच आखला भयानक प्लॅन, बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का

विदिशाच्या(Vidisha) लटेरी(lateri) येथील मलिया खेडी येथे मंगळवारी रात्री नवविवाहित जोडपं सोबत झोपलेलं असतानाच पतीची हत्या(Murder Of Husband) झाली. यावेळी पत्नीनी आपण बेशुद्ध होतो असं सांगितलं, मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच पत्नीवर संशय होता. आता याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

    भोपाळ : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षकांनी लटेरी येथे जाऊन या घटनेचा खुलासा केला आहे. पत्नी कृष्णाबाई हिनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या (Wife Killed Her Husband) केल्याचं समोर आलं आहे.

    प्रियकर (Lover) शुभम याच्यासोबत मिळून महिलेनं आपल्याच पतीचा जीव घेतला होता. पत्नीनं पतीचे हात पकडून ठेवले तर तिच्या प्रियकरानं कुऱ्हाडीनं वार करत हत्या केली.

    पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, विदिशाच्या लटेरी येथील मलिया खेडी येथे मंगळवारी रात्री नवविवाहित जोडपं सोबत झोपलेलं असतानाच पतीची हत्या झाली. यावेळी पत्नीनी आपण बेशुद्ध होतो असं सांगितलं, मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच पत्नीवर संशय होता. आता याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

    एक दिवस आधीच सासरी आलेल्या पत्नीनं आपल्या चार वर्षांपासूनच्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. महिलेनं आपल्या प्रियकराला फोन करून बोलावलं. ती म्हणाली, की तू घरी ये आणि सोनूला मारून टाक. शुभमनं आपल्या गाडीत बावीसशे रुपयांचं पेट्रोल टाकलं आणि कुऱ्हाड घेऊन हत्या करण्यासाठी गावात आला.यानंतर दोघांनी हत्या केली. लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसातच पत्नीनं आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली.