सीमेवरील हल्ला सहन करणार नाही; जसा प्रश्न तसेच उत्तर देऊ! गृहमंत्री शाहांचा इशारा

गोव्या मुख्यत: विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष आहे. बाकी कोणी विरोधक असणार नाही. प्रथम राज्य म्हणून मी काम करत आहे. राज्याच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक मानसाला मी घरी पाठवले आहे. यावेळी सावंत यांनी आपवर जोरदार हल्ला चढवला.

  पणजी (Panaji) : पूंछमध्ये (Poonch,) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (the terrorist attack) भारताने पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला. भारत देशाच्या सीमेवरील हल्ला कदापी सहन करणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांनी दिला. शाह हे गोव्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान एका सभेत बोलत असताना त्यांनी हे विधान केले. गोव्यामध्ये ‘राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठा’च्या (the National University of Forensic Sciences) भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

  कित्येक वर्ष दहशतवादी देशाच्या सीमा ओलांडून भारतात यायचे, दहशतवाद पसरवायचे आणि दिल्ली दरबारातून एका निवेदनापलिकडे काहीही व्हायचे नाही. पूंछमध्ये हल्ला करण्यात आला, आपले जवान जाळण्यात आले त्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वात सीमांचे संरक्षण करत सार्वभौमत्वाचा गौरव प्रस्थापित केला. एक काळ होता जेव्हा शब्दाने उत्तर दिले जात होते, मात्र आज समोरून जसा प्रश्न येईल तसेच उत्तर दिले जाते.

  - अमित शाहा, केंद्रीय गृहमंत्री

  ‘आप’ने स्वतःच्या राज्यात किती जणांना नोकऱ्या दिल्या, ते बघावं !
  गोव्यात पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, आप, टीएमसी हे पक्ष राजकीय आखाड्यात उतरले आहेत. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपली भूमिका मांडली. सावंत म्हणाले, लोक आमच्या बरोबर आहेत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी मला विश्वास आहे. परत एकदा भाजपाचे सरकार गोव्यामध्ये स्थापन होईल.

  गोव्या मुख्यत: विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष आहे. बाकी कोणी विरोधक असणार नाही. प्रथम राज्य म्हणून मी काम करत आहे. राज्याच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक मानसाला मी घरी पाठवले आहे. यावेळी सावंत यांनी आपवर जोरदार हल्ला चढवला. आपने आधी स्वतःच्या राज्यात कीती जणांना नोकऱ्या दिल्या ते बघावं त्यानंतर गोव्यात पोस्टरबाजी करावी, असे सावंत म्हणाले.