आधीचा बॉयफ्रेंड त्रास द्यायचा म्हणून तिने नविन बॉयफ्रेंड पटवला आणि… विवाहीत महिलेच्या कारनाम्यात गेला पतीचा बळी

उत्तर प्रदेश : प्रियकराच्या मदतीने एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. मात्र, पतीची हत्या करण्यामागचा या महिलेचा हेतू समजल्यावर तिच्या प्रियकरालाही धक्का बसला. पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात हा गुन्हा घडला आहे. एका महिलेला तिचा बॉयफ्रेड त्रास देत होता. हा बॉयफ्रेंड तिचा दीरच होता. या दोघांचे अनैतिक संबध होते. मात्र, तो तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. त्याच्या या त्रासाला ती कंटाळली होती.  बॉयफ्रेडचा काटा काढण्यासाठी तिने नविन बॉयफ्रेंड पटवला.

या नविन बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या करुन या हत्या प्रकरणात आधीच्या बॉयफ्रेंडला अडकवण्याचा कट तिने रचला. नविन बॉयफ्रेंडच्या मदतीने या महिलेने आपल्या पतीची गळा दाबून हत्या केली.

यानंतर पोलिस तपासात तिने आधीच्या बॉयफ्रेंडवर संशय असल्याचे पोलिसांना सांगीतले. त्यानुसार पोलिसांनी तिच्या आधीच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. या महिलेनेच नविन प्रियकराच्या मदीतने पतीची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.