Woman accused of molesting a young woman under the Love Jihad Act

काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय गर्भवती महिलेच्या पती आणि दिराला अटक केली. पिडितेचे नाव पिंकी असे आहे. पिकीने कोर्टात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तिने आपला छळ करत गर्भपात केल्याचेही सांगितले आहे. परंतु प्रशासनाने हे आरोप खोटे असल्याचे मत स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेश : योगी सरकारने लव्ह जिहाद विरोधात (Love Jihad Act) तयार केलेल्या कायद्यांतर्गत तरुणीचा छळ (molesting a young woman) करुन गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद कायदा (UP Love Jihad Act) आणल्यानंतर लव्ह जिहाद रोखण्यासाठी जोडप्यांना या कायद्यांतर्गत चौकशीच्या जाळ्यात पकडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बजरंग दलाने (Bajrang Dal) जबरदस्ती २२ वर्षीय तरुणीला पकडून लव्ह जिहाद कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. आणि त्या तरुणीचाही छळ करुण गर्भपात केला असल्याचे आरोपात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय गर्भवती महिलेच्या पती आणि दिराला अटक केली. पिडितेचे नाव पिंकी असे आहे. पिकीने कोर्टात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तिने आपला छळ करत गर्भपात केल्याचेही सांगितले आहे. परंतु प्रशासनाने हे आरोप खोटे असल्याचे मत स्पष्ट केले आहे.

माझा नारी निकेतनमध्ये खूप छळ केला गेला – पिंकी

बजरंग दलाच्या लोकांनी जबरदस्तीने लव्ह जिहाद कायद्यांतर्गत पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर पिंकीला नारी निकेतनमध्ये ठेवण्यात आले. पिंकीने कोर्टापुढे बोलताना म्हटले आहे की, तिचा नारी निकेतनमध्ये प्रचंड छळ करण्यात आला आहे. त्यामुळे पोटात असुया वेदना होऊ लागल्या, तिने सुरुवातील दुर्लक्ष केले परंतु नंतर अति त्रास झाल्यावर अधिकाऱ्यांनी रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात डॉक्टकरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे माझा गर्भपात झाला असल्याचे तिने सांगितले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याचेही तिने कोर्टापुढे म्हटले आहे.

तसेच पिंकीने न्यायालयासमोर आपण सज्ञान असून आपल्या मर्जीने लग्न केल्याचे कबूल केले आहेत. तसेच पती आणि दिराला लवकरात लवकर मुक्त कण्याची विनंती पिंकीने कोर्टाला केले आहे. पिंकीचे बोलणे ऐकल्यावर न्यायालयाने पोलीसांना फटकारत तिला सासरी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन हे नक्की सिद्ध होते की लव्ह जिहाद कायदा करुनही उत्तर प्रदेशात महिलांचे छळ होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.

पिंकीने पुढे असे म्हटले आहे की, तिचा पती लग्नाची नोंदणी करणार होते. परंतु त्याआधीच बजरंग दलाच्या लोकांनी कारवाईचा बडगा उचलला. आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा गुन्हा दाखल करुन घेतला. उत्तर प्रदेशचे बालहक्क संरक्षण अधिकारी विशेष गुप्ता यांनी मात्र गर्भपात झाल्याची बाब फेटाळून लावत महिलेचा गर्भ सुरक्षित असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ‘तब्येत बरी नसल्यानं या महिलेला संस्थेमधून जिल्हा महिला न्यायायात नेण्यात आलं होतं. गर्भपात झाल्याची बाब अफवा आहे.’ असे स्पष्ट केले आहे.