roti in cooker

एक चपाती तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video of Chapati making)झाला आहे.

    फेसबुक किंवा युट्यूबवर अनेकजण वेगवेगळ्या पाककृती शेअर करत असतात. या पाककृती अनेकजण करुन बघत असतात. सोशल मिडीयामुळे आपल्याला कोणत्याही प्रांतातल्या रेसिपीविषयी माहिती मिळवणे सोपे झाले आहे. तसेच स्वयंपाक करताना आवश्यक असलेल्या काही बारीकसारीक गोष्टी देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. असाच एक चपाती तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video of Chapati making)झाला आहे.

    जर एखाद्याकडे तवा उपलब्ध नसला तरी परिपूर्ण चपाती कशी भाजली जाऊ शकते,याचे प्रात्यक्षिक व्हिडिओतल्या महिलेने दाखवलं आहे. लोकांना या महिलेच्या कुकरमध्ये चपात्या भाजण्याच्या क्रियेचे खूप आश्चर्य वाटत आहे.

    या व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्या स्वयंपाक घरातील गॅस पेटवला असून त्यावर रिकामा कुकर ठेवला आहे. . त्यानंतर लाटलेल्या ३ चपात्या या महिलेने त्या रिकाम्या प्रेशर कुकरमध्ये ठेवल्याचं दिसतं. त्यानंतर त्या महिलेनं कुकरचं झाकण बंद केलं. हे झाकण घट्ट बंद केल्यानंतर ही महिला व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांना २ मिनिटं थांबण्याची विनंती करते.काही वेळेनंतर ही महिला प्रेशर कुकरचं(Pressure Cooker)झाकण उघडते. त्यानंतर कुकरमध्ये भाजलेल्या चपात्या ही महिला झाऱ्याच्या साहाय्याने स्वच्छ प्लेटमध्ये काढताना व्हिडीओत दिसत आहे.

    तव्यावर भाजलेल्या चपात्या आणि कुकरमध्ये भाजलेल्या चपात्या यामध्ये काहीही फरक नसल्याचं या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसतं. चपात्या भाजण्याची ही नवी पद्धत अनेकांना नक्कीच उपयुक्त ठरु शकते. कारण या प्रक्रियेत प्रेशर कुकरच्या माध्यमातून भात,वरण आणि चपातीसुध्दा तयार करता येऊ शकते. ही पाककृती सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.